आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीने केला गुणवंतांचा सन्मान !

सन्मान चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पदोन्नत मुख्याध्यापकांचा,
उपक्रम आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा!
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील सैनिक स्कूलला निवड झालेले विद्यार्थी, १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत पाल्य, पदोन्नती मिळालेल्या व सर्व वरिष्ठ मुख्याध्यापकांचा संयुक्तिक सन्मान सोहळा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक बँक सभागृह आटपाडी येथे संपन्न झाला.
यावेळी भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, शिक्षक बँक चेअरमन यु.टी.जाधव व वित्त लेखा प्रमुख प्रशांत चंदनशिवे आदि मान्यवर उपस्थित होते.
भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर म्हणाले,नेहमीच शिक्षक समितीने गुणवंताच्या पाठीवरती थाप टाकण्याची परंपरा कायम जोपासली आहे. शिक्षकांचे कोणतेही प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही सभापती व उपसभापती या दोघांनी व्यक्त केली. शिवाय सातत्त्याने शिक्षक समिती चांगले शिक्षक उपयोगी व समाजोपयोगी उपक्रम राबवत असते,याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी व नवनियुक्त मुख्याध्यापकांना शाळेचा व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव व डॉ.आंबेडकर शाहू फुले रुग्णालयाचे संचालक श्रीकांतराजे कुंभार या दोघांनी शुभेच्छा दिल्या.
सरचिटणीस नानासाहेब झुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.अध्यक्ष संजय कबीर यांनी सूत्रसंचालन केले.माजी अध्यक्ष श्याम ऐवळे यांनी आभार मानले. शिक्षक समिती पदाधिकारी – विभाग सचिव दीपक कुंभार,आदर्श शिक्षक हैबतराव पावणे,अजय राक्षे, सचिन देठे, यशवंत मोरे, सत्यवान माने, भास्कर डिगोळे ,प्रवीण बाड, विजय पवार, संतोष पिसे,बाळासाहेब साळुंखे, इन्ताब इनामदार,वैशाली राक्षे,अनिता जाधव, उषा माळी, विद्या आव्हाड इत्यादी उपस्थित होते.