

पोलीस बांधवांना राखी बांधून केला रक्षाबंधन सण साजरा
राष्ट्रवादी महिला आघाडी वतीने शाल,श्रीफळ व राखी बांधून केले सन्मानित!
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर) :
रक्षाबंधन हा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी बहिण भावाला राखी बांधते की भावाने सदैव बहिणीची रक्षा करायला हवी. राखी ही बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जिल्ह्याच्या अध्यक्षा संगीताताई ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.२१ रोजी कोरोणा महामारीच्या काळात स्वत:च्या जीवाची परवा न करता सामान्य जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारे पोलीस बांधवांना रक्षाबंधन केले.
आसेगाव पुर्णा येथे राष्ट्रवादी काॅग्रेस महिला आघाडी तालुका चांदुर बाजारच्या महिलांनी रक्षाबंधन निमित्ताने पोलीस बांधवाना कोरोना योद्धा म्हणुन शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन व राखी बांधुन त्यांना सन्मानित केले.यावेळी पोलीस स्टेशनचे किशोर तावडे यांना सन्मानित करण्यात आले.व त्यांचे सहकारी सतिश प्रधान,संतोष मोरे, नरेंद्र आघाडे,जिजावराव पाटील, राजेंद्र काळे,राजेश उमक, मोरेश्वर शेकार, नंदकिशोर बाकल, अखिल दळवी,राहुल गौरखेडे,मनिष काटोलकर,विजय खोडे,किशोर निबोकार,सचिन धांडे,जितेश बाबील,रूपेन्द्र तायडे,अमित मुळे,निलेश जामनिक,निखिल तलमले सर्वांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा संघटन सचिव सविताताई पोहोकार, जिल्हा सरचिटणीस शारदाताई करडे, विधानसभा अध्यक्षा शैला जंवजाळ,जेष्ठ कार्यकर्त्या सुग़ाबी अजीज, तालुका सदस्या संगीताताई साबळे, नलिनी खडसे, माजी पं.स.सदस्या, ग्राम पं सदस्या शिल्पा गवई,विद्या कलाणे, जोस्ना ठाकरे,रिता राऊत अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी महिला पोलिस याचांही पुष्पगुछ देवुन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक आशाताई गोटे यांनी केले. आभार शिल्पा गवई यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्षा आशाताई गोटे यांनी केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद