बनपुरी येथे शहीद जवान विष्णू पुकळे यांचा स्मृतीदिन साजरा

प्रगल्भनायक न्युज नेटवर्क /आटपाडी:
शहीद जवान विष्णू सुखदेव पुकळे यांचा १८ वा स्मृतिदिन बनपुरी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सकाळी शहीद जवान विष्णू पुकळे यांच्या डिजीटलचे उद्घाटन तहसीलदार सचिन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभातफेरीवेळी ग्रामपंचायत कार्यालय, विकास सोसायटी, वाचनालय आदि संस्थांमध्ये प्रतिमापूजन करण्यात आले.रक्तदान शिबीराचे उद्घाटन सेवानिवृत्त सैनिक मेजर बापूसाहेब सोन्नूर यांच्या हस्ते करण्यात आले.भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व १२.०० वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाधीस्थळी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, युवानायक अनिलशेठ पाटील, भाजपा नेते जयवंतराव सरगर, ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील, गटविकास अधिकारी मनोज भोसलेे, माजी सभापती हर्षषवर्धन देशमुख, पंचायत समिती सदस्य रुपेश पाटील,भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराम मासाळ, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त मेजर बापूसाहेब सोन्नूर,तुकाराम यमगर, श्रीरंग यमगर, जवान देवकते यांच्यासह पंचक्रोशीतील व तालुक्यातील जवानांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
जगन्नाथ पुकळे, बापूसाहेब सोन्नूर,हैबतराव पावणे, दिलीप मंडले, सचिन कांबळे, बिरा बंडगर, अमर वेळापुरे, शहाजी ऐवळे, शिवाजी खताळ,तसेच
शहीद जवान विष्णू पुकळे कला, क्रीडा व सांस्कृतिक मंच, ग्रामपंचायत, सोसायटी,सर्व संस्था, रक्तदाते व ग्रामस्थ यांच्यासह शहीद विष्णू पुकळे प्रेमींनी covid-19 चे सर्व नियम पाळून कार्यक्रम यशस्वी केला. सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन केले.
ज्ञानदेव देशमुख,केराप्पा पुकळे,गोरख पुकळे,सागर वलेकर,सोनू मदने,धनंजय कांबळे आदि युवकांनी स्मारक सजावट केली.