प्रगल्भनायक न्युज नेटवर्क /आटपाडी:
शहीद जवान विष्णू सुखदेव पुकळे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि.१३ ऑगस्ट रोजी बनपुरी येथे समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० वाजता शहीद जवान विष्णू पुकळे यांच्या डिजीटलचे उद्घाटन, सकाळी ९.०० वाजता प्रभात फेरी व प्रतिमापूजन, सकाळी १०.०५ वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन, सकाळी ११.०० वाजता मान्यवरांची मनोगते, सकाळी ११.३० वाजता भजनाचा कार्यक्रम व १२.०० वाजता समाधीवर पुष्पवृष्टी व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९.३० वाजता वंदे मातरम घेण्यात येणार आहे.
शहीद जवान विष्णू पुकळे कला, क्रीडा व सांस्कृतिक मंच, ग्रामपंचायत, सोसायटी,सर्व संस्था, रक्तदाते व ग्रामस्थ यांनी covid-19 चे सर्व नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद