अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत शहरातील सातारा रोड,लगत असणाऱ्या कंठी फार्म येथे बंडा जातगार (वय ४०) रा.जत याचा खून झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी जत पोलिसांनी शहरात नाकाबंदी करत खूनातील संशयित आरोपी संतोष हारणे (वय ३५) यास अटक केली आहे. पैशाच्या करणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी,जत येथील बंडा जातगार हे म्हैधशी खरेदी-विक्रीचा व्यापार करतात. त्यांनी जत येथील देवनाळ रोडवर राहणाऱ्या संतोष हारणे याच्याकडून ३५ हजार रुपये व्यवहारातून घेतले होते. याच कारणातून जातगार व हारणे यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जातगार व हारणे यांच्यात वाद झाला. हा वाद जत येथील एकाने मिटवला.वाद मिटवल्यानंतर मध्यस्थी व जातगार, हारणे यांनी मिळून गावात येवून चहाही घेतला.
बंडा जातगार यास दोघे मिळून सातारा रोडवरील कंठीकडे जाणाऱ्या फार्म हाऊसकडे जावू असे सांगितले. दोघे मिळून निघून गेले. त्यानंतर सतोष हारणे याने बंडा जातगार याच्यावर धारदार शस्त्राने जोरदार वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली.त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संतोष हारणे यास ताब्यात घेतले.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या