अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आम.गणपतरावजी देशमुख यांना विधानसभेमध्ये दहा वर्षे काम करताना पाहिले आहे.दुष्काळाच्या व्यथा पोटतिडकीने मांडून प्रश्न व्यवस्थित मार्गी लावणारे एकमेव आमदार म्हणून त्यांचे नाव घेतले तर वावगे ठरणार नाही. अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी, न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असा शोक व्यक्त करीत जतचे आम. विक्रमसिंह सावंत यांनी माजी आम.गणपतरावजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सांगोल्याचे आमदार कै.गणपतराव देशमुख ( आबा ) यांच्या जत येथील शोकसभा आयोजित कार्यक्रमावेळी उपस्थित विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत, विद्यमान लोकनियुक्त जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई बन्नेनवर, माजी आमदार विलासराव जगताप, जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,संभाजी ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्ष श्रीमंत कोकाटे व तालुक्यातील युवा नेते, जिल्हा परिषद सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब मासाळ, सामाजिक कार्यकर्ते विक्रम (भैय्या) ढोणे,प्रहार संघटना जत तालुका प्रमुख सुनिल बागडे,रासपचे अजित पाटील, आर.पी.आयचे संजय कांबळे, शिवसेनेचे नेते अमित दुधाळ, दिनकर पतंगे, अँड.सुरेश घागरे, तुकाराम माळी (सर), सर्वोदय पतसंस्थेचे संचालक रामचंद्र मदने,सामाजिक कार्यकर्ते पुकार आवटे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद