
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /येडेमच्छिंद्र:
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १९४३ साली ब्रिटीशांचा खजिना घेऊन जाणारी आगगाडी गडखिंडीत लुटली होती. त्या गडखिंडीतील वनविभागाच्या जागेत क्रांतिसिंहांचे भव्य-दिव्य स्मारक उभारावे, यासाठी १५ ऑगस्ट रोजी परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव घेतले जाणार असल्याचे अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ जीवन गौरव अभियानाचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी सांगितले.
वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची १२१ वी जयंती अर्थक्रांती राष्ट्रीय साक्षरता मंच,भारतीय जेष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान यांच्या वतीने आयोजित करण्यात आली.
वाळवा व कडेगाव तालुका येथील जेष्ठ नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.अर्थक्रांतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी अर्थक्रांती व भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ जीवनगौरव अभियानाविषयी माहिती सांगितली व आजपासून ज्येष्ठांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
अॅड. किरण पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्व इतिहास सांगितला.
ग्रामपंचायतमध्ये सर्व ज्येष्ठांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.वाळवा तालुका अध्यक्ष अशोक गोडसे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी माहिती सांगून ज्येष्ठांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले. सरपंच गणेश हराळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष हणमंतराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील,व्यंकटराव पाटील, भूपाल साळुंखे, मोहन कुलकर्णी, राजाराम पवार, बाळासाहेब मदने,विजय पाटील, सुभाष पाटील, कृष्णा कोळेकर, बाबुराव तुपे, महादेव सावंत,आनंदराव जाधव, श्रीनिवास खंडागळे, महादेव पाटील,शहाजी पाटील, सुबराव पाटील, आदि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद