आटपाडी तालुका : कोरोनायन दि.०५/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ०५ ऑगस्ट रोजी नव्याने ४६ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर ६९ रुग्ण कोरोनामुक्त झालेे आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २६ पुरुष असून २० स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १५ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ४३ व तालुक्याबाहेरील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.०५ ऑगस्ट,२०२१)
आटपाडी ११
पिंपरी खुर्द २
गळवेवाडी ३
पुजारवाडी(दि) २
उंबरगाव १
दिघंची ६
बोंबेवाडी ३
मेटकरवाडी १
हिवतड ६
शेटफळे १
देशमुखवाडी १
करगणी १
घरनिकी(बेरगळवाडी) ४
वलवण १
मंथा(जालना) १
खवासपूर १
लवटेवाडी(सांगोला) १

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर