आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी आरोग्यविषयक ऑनलाइन वेबिनार संपन्न

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी मॉडर्न होमिओपॅथी, कोल्हापूर आणि प्राथमिक शिक्षक समिती आटपाडी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
सध्याच्या कोरोनाकाळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे.पण सर्वांनाच स्वतःहून आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही.त्यामध्ये कोरोनामुळे उपचारासाठी दवाखान्यामध्ये जाण्याची भीतीही अनेकांना वाटते. या सर्व बाबींचा विचार करून मॉडर्न होमिओपॅथी कोल्हापूर आणि प्राथमिक शिक्षक समिती आटपाडी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
वेबिनारमध्ये कोरोना तिसरी लाट, दुर्धर आजार व त्यावरील आधुनिक होमिओपॅथीची उपचार पद्धती,किडनी,लिव्हर,कॅन्सर व सांधेदुखी आदि आजारांविषयी आॕनलाईन व्याख्यान,आजारांविषयी शंका,समस्या,प्रश्न या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.शिक्षकांनी आॕनलाईन वेबीनारचा लाभ घेतला.
लवकरच येत्या १५ दिवसांत तालुक्यातील महिलांसाठीही या वेबीनारचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष संजय कबीर यांनी सांगितले.