
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
भांबुर्डी येथे गणेशमंदिर गणेशनगर भांबुर्डी येथे लक्ष्मण काळेल यांच्या वाढदिवसाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.माळशिरस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
क्रांतीचे ढोल नव्हे ! त्यास तुझी चर्म हवे !
वांझोटी शब्द नको ! रक्ताचे दान हवे !
जगात कोरोनाने थैमान घातल्यामुळे रक्ताची गरज भासू लागली आहे. कुठेतरी कोणालातरी तुमच्या रक्ताची गरज आहे. म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवानिमित्ताने ५० रक्तदात्यांनी केले.
रक्तदानाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरया प्रतिष्ठान गणेशनगर व आठवण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
यावेळी मोहिनी वाघमोडे पाटील, डॉ.नितीन वाघमोडे,डॉ.पंकज नलवडे, माजी उपसरपंच दादासाहेब वाघमोडे,पोलीस पाटील रावसाहेब वाघमोडे,येळीवचे सरपंच अतुल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट वाघमोडे, रोजगार सेवक संतोष वाघमोडे,अजिंक्य मेडीकल मकरंद कुदळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर सरगर यांनी केले.पोलीस पाटील रावसाहेब वाघमोडे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद