संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
श्री सन्मती सेवा दल व उपवनसंरक्षक (प्रा.) सोलापूर वनविभाग व वनपरिक्षेत्र, माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने नातेपुते येथे वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार रामभाऊ सातपुते,श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी व अध्यक्ष विरकुमार दोशी,वनपरिक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख, वनपरिमंडळ अधिकारी एस. एस.क्षीरसागर, वनपरिमंडळ अधिकारी एच. व्ही. साळुंखे,एस. एम. लडकत, श्री सन्मती सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्याबद्दल वनविभागातर्फे श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी व अध्यक्ष विरकुमार दोशी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जिनेंद्र दोशी (बोंडले), महावीर शहा (श्रीपूर), अविनाश दोशी (नातेपुते), नवजीवन दोशी (वेळापूर), महावीर दोशी (नातेपुते), अभिजीत दोभाडा (माळशिरस), अमित दोशी (माळशिरस), राजेंद्र डुडू (नातेपुते), संजय गांधी (नातेपुते), सनतकुमार गांधी,भरतेश गांधी (फोंडशिरस) डाॅ.निलेश फडे (शंकरनगर), नितेश फडे (अकलूज), अमित व्होरा (माळीनगर), नमन गांधी (पंढरपूर), सनदकुमार दोशी (पुरंदावडे), योगेश गांधी (अकलूज), अभिजीत दोशी (सदाशिवनगर), योगराज गांधी (अकलूज), रत्नकुमार फडे (अकलूज), डाॅ. दिपक गांधी (नातेपुते), अमित देशमाने (माळशिरस)तसेच अकलूज,माळशिरस,पंढरपूर, सदाशिवनगर, फोंडशिरस, नातेपुते,पुरंदावडे,श्रीपुर, वेळापूर इ.गावातील श्री सन्मती सेवा दल संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद