माळशिरस येथील ‘श्रीनाथ’चा ‘शिक्षण आले दारी’ उपक्रम कौतुकास्पद!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयाने कोरोना महामारीत मुलांच्या शिक्षणाच्या सातत्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
प्राथमिक वर्ग गेल्या वर्षभर सुरु नाहीत.याही वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊनच अभ्यास घ्यायचा म्हणजेच ‘शिक्षण आले दारी’ या उपक्रमातंर्गत विद्यालयातील आसपासच्या परिसरातील विद्यार्थी, मोटेवाडी, भांबुर्डी, गोरडवाडी, जळभावी, तिरवंडी या भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम विद्यालयातील सहशिक्षिका मनिषा तिकुटे व अंजूम शेख या प्रभावीपणे हा उपक्रम राबवित आहेत.
संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक नियमांचे पालन करीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत हा उपक्रम सुरु आहे.या उपक्रमामुळे मुख्याध्यापक योगेश गुजरे यांनी शिक्षकांचे कौतुक केले.