
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
पानीव ता. माळशिरस येथे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शेंडगे व जगन्नाथ तोरणे यांनी पानीव येथील चोरीला गेलेली स्मशानभूमी व डांबरी रस्ता परत मिळवा व पानीव गट नंबर ३० मध्ये स्मशानभूमी व्हावी, न झाल्यास जलसमाधी घेत आहोत असा फलक लावून उपोषणकर्ते तलावानजीक उपोषणाला बसले आहेत.यासाठी अकलूज पोलिस स्टेशनकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
प्रशासनाने उपोषणकर्ते यांना दोन दिवसांचा कालावधी मागीतला असून योग्य ती कारवाई करू असे सांगितले असल्याने आपण दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्यावर ठाम असल्याचे उपोषणकर्ते बाबासाहेब शेंडगे व जगन्नाथ तोरणे यांनी सांगितले.
या उपोषणास क्रांतीकारी संघर्ष सेना माहिती सेवाभावी संस्था यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद