
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौक जत येथे गोरगरीब, शेतकरी,शेतमजूर, कामगार, अंध, अपंग या लोकांना महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले.
या सर्व जनतेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या व आपले समाधान व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस कारमपुरी महाराज सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख आनंदबापू पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जत विधानसभा संपर्कप्रमुख तानाजी (भाऊ) गुरव मुंबई यांचे सल्ल्यानुसार सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके,शाखाप्रमुख अर्जुन भोसले,शाखाप्रमुख भिमराव आरसुळे,शाखाप्रमुख अब्बास मुजावर, युवा सेना सरचिटणीस रोहित पाचंगे,माजी शहर प्रमुख विजय चव्हाण, शहर प्रमुख पप्पू भिसे, देवनाळ येथील शिवसैनिक उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद