आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून दिघंची, करगणीत रुग्णवाहिका लोकार्पण!

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिघंची व करगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका देण्यात आल्या. याचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी दहा वाजता दिघंची येथील महादेव मंदिर व नंतर करगणी येथे पार पडला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपा नेते जयवंतराव सरगर ,जि. प. सदस्य मोहनराव रणदिवे, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, ब्रम्हदेव होनमाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिघंची व करगणी या दोन्ही आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असून रुग्णवाहिकेची कमतरता होती. दिघंची व करगणी ही दोन्ही गावे तालुक्यातील मोठी गावे असून याठिकाणी उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण असतात. रुग्णांची सोय व्हावी व वेळेत उपचार मिळावेत, यासाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दोन्हीही आरोग्य केंद्राचे काम उत्कृष्ट आहे.या दोन्ही आरोग्य केंद्रातर्गंत अनेक गावे येत असून या ठिकाणच्या रुग्णांची सोय व्हावी, म्हणून रुग्णवाहिका देण्यात आल्या. लवकरच तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी कार्डियाक रुग्णवाहिका देवू.
यावेळी उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी उपसभापती बळीआण्णा मोरे, माजी उपसभापती तानाजीराव यमगर,जेष्ठ नेते विजयसिंह पाटील,भगवानराव सरगर, माजी ग्रा.पं.सदस्य नाथा सरगर, सावंता पुसावळे, सोपान काळे,ग्रा. पं. सदस्य पिंटूपंच सरगर, माजी सरपंच बाळासाहेब सरगर,निलेश कांबळे, भारत सरगर, मार्केट कमिटीचे संचालक विष्णुपंत अर्जुन,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, भाजपा नेते हरीशेठ गायकवाड, बाळासाहेब होनराव, मुन्ना तांबोळी, भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, माजी अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, तालुका उपाध्यक्ष शेखर रणदिवे, अविनाश रणदिवे, चंद्रकांत पुसावळे, माजी उपसभापती रुपेश पाटील,आण्णासाहेब रणदिवे, निंबवडेचे सरपंच देठे, दादासो कुचेकर, विकास मोरे,विठलापूरचे सरपंच विठ्ठल बाड, लिंगीवरेचे सरपंच विराज पुजारी, उंबरगावचे सरपंच शिवाजी कुचेकर, माजी सरपंच भगवान दडस, माजी सरपंच महादेव लवटे, माजी सरपंच आबासो पुजारी, माजी सरपंच मंगेश मगदूम, माजी सरपंच गजेंद्र पिसे व तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका दिल्याने सरपंच अमोल मोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले.