
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस शहराच्या श्री विजयलिंग मल्लिनाथ मंदिर आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.आपलं झाड फाउंडेशनच्या माध्यमातून दहा कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असून श्री विजयलिंग मंदिर या मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी माळशिरस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, उपनगराध्यक्ष डॉ.मारुती पाटील, माजी सरपंच विकासदादा धाईंजे, युवा उद्योजक सचिन वावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, निसर्गप्रेमी डाॅ. नितीन वाघमोडे, योगेश घोलप,अँड. दादासाहेब पांढरे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, तसेच आपलं झाड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमीर शेख, उपाध्यक्ष सुनील धायगुडे, सचिव सुनील माने, खजिनदार दादासो मारुती वाघमोडे, मार्गदर्शक हनुमंत सरगर,अशोक जाधव, सदस्य योगेश घोलप, चंद्रकांत जाधव, रशीद शेख,विलास वामन, शमा शेख, आप्पा माने,अशोक सरगर, दादासो सरगर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद