‘वंचित’चे अमोल साबळे यांची कुटुंबाला भेट
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरातील उमरानी रोड गोल्हारी वस्ती येथे पावसामुळे चव्हाण कुटुंबीयांचे राहते घर कोसळल्याने दीदी चव्हाण ही सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आठ ते दहा टाके पडलेले आहेत.
ही बातमी वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोलभैय्या साबळे यांना समजताच सामाजिक बांधिलकी जपत त्यांची सर्व टीम त्याठिकाणी पोहचून सर्व पाहणी करून त्या मुलीला मदतीचा हात देत भरीव मदत केली जाईल असा विश्वास दिला. या उघड्यावर पडलेल्या चव्हाण कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढे यावे असे आवाहन अमोल भैय्या साबळे यांनी केले.
तसेच प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली.
या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोल भैय्या साबळे, हारून इनामदार, अनील कांबळे, मोनु साबळे, जनार्दन बिराजदार, आकाश कांबळे, सुरेश कोळी,प्रणव बाबर, पप्पू कांबळे पप्पू सनदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद