५३ पॉझिटिव्ह !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.२३/०७/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २३ जुलै रोजी नव्याने ५३ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २८ पुरुष असून २५ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ३३ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ५१ व तालुक्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. रुग्णसंख्या पुन्ह वाढू लागल्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२३ जुलै,२०२१)

आटपाडी १९
पुजारवाडी (आ) १
मापटेमळा ३
पळसखेल ४
मासाळवाडी १
देशमुखवाडी २
विठलापूर ३
काळेवाडी १
वलवण १
नेलकरंजी ३
झरे ३
करगणी १
लेंगरेवाडी ३
गळवेवाडी १
चिंचाळे १
तडवळे १
हिवतड २
घाणंद १
शिंगोर्णी १
गौडवाडी १