
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोरडवाडी यांच्यावतीने
कोरोणा योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रीय बेंदूर सणाचे औचित्य साधून गोरडवाडी जिल्हा परिषद शाळेत माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत भोसले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडीच्या मुख्याध्यापिका कै.सुरेखा पुदे यांचे कोरोनाने निधन झाले.त्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी व यमगरवस्ती शाळा,नरळेवस्ती शाळा तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका ,कर्मचारी व आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका मदतनीस ,गोरडवाडी बचत गट, सी.आर.पी.,पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी,पोलीस पाटील ,मेजर ,तलाठी ,कृषी सहाय्यक ,वन विभागातील अधिकारी व कर्मचारी,वनमजूर,रेशन दुकानदार ,ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या (Covid 19 ) या महामारीमध्ये आपलं कर्तव्य बजावत मोलाचे योगदान दिले.त्यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र व रातराणीचे झाड तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत भोसले ,दिग्विजय शहा ,विजय लोखंडे ,रवींद्र पवार,मेजर युवराज पिंगळे ,नानासाहेब यमगर,उपसरपंच दिपक गोरड , सदस्य शंकर यमगर ,विष्णू गोरड , संस्थेचे अध्यक्ष भारत गोरड, संस्थेचे सचिव पत्रकार संजय हुलगे ,दादासाहेब हुलगे,माजी सरपंच रामचंद्र गोरड ,भागवत कर्णवर,हनुमंत गोरड ,चेअरमन खंडू कळसुले ,माजी चेअरमन संतोष गोरड,तायाप्पा गोरड,आप्पा गोरड ,जगन्नाथ गोरड ,भारत गोरड ,आबा पिंगळे ,भारत सरगर ,नानासाहेब पिंगळे ,नवनाथ सूर्यवंशी ,बापू केंगार ,दादा गोरड ,सचिन पिंगळे,तात्या कोकरे,आगतराव गोरड उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामभाऊ गाढवे,लक्ष्मण गोरड ,नामदेव गोरड ,शिवाजी गोरड ,हनुमंत शिंगाडे ,अमोल गोरड,बजीरंग शिंगाडे ,आबा गोरड तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .प्रकाश जाधव यांनी केले. प्रास्ताविक संघर्षयात्री प्रा. दादासाहेब हुलगे यानी केले. आभार राजेंद्र गोरड यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद