घर झाले जमीनदोस्त, शिवसेना संपर्कप्रमुखांनी धीर दिला मस्त!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

जत शहरातील गोल्हारवस्ती येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी शासनाकडून घरकुल योजना मंजूर झाली होती.पण तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसाने तिथे राहणारे चव्हाण कुटूंबियांचे घर जमीनदोस्त झाले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एका लहान चिमुकलीला दुखापत झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता, जत शिवसेना तालुका संपर्कप्रमुख तानाजीभाऊ गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. व संबंधित कुटुंबाला धीर दिला. आम्ही तुमच्या सोबत आहोत.शासनाकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू,असेही तानाजी भाऊ गुरव म्हणाले.ते शिवसंपर्क अभियानानिमित्त जत दौऱ्यावर आले होते.
यावेळी जत तालुका संघटक अमित (बंटी) दुधाळ, युवा सेना तालुका प्रमुख सचिनभाऊ मदने,शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजी पडळकर, संभाजी चंदनशिवे,जत शहर प्रमुख विजयराजे चव्हाण, युवासेना जत प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ, कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, शिवसेना जेष्ठ नेते पप्पू चव्हाण, सुरेश घोडके उपस्थित होते. त्यांनी चव्हाण कुटूंबियांना धीर दिला व तसेच आर्थिक मदतही केली.