युवा उद्योजक सचिन वावरे यांचे दातृत्व! गोरेवस्ती येथे स्वखर्चाने बांधला पूल!

युवा उद्योजक सचिन वावरे यांचे दातृत्व!
गोरेवस्ती येथे स्वखर्चाने बांधला पूल

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

समाजकारणाबरोबर राजकारण करणारी मंडळी समाजामध्ये बोटावर मोजण्याइतपत पाहवयास मिळतात. राजकारणाचा कसलाही वारसा नसलेले माळशिरस तालुक्यातील युवा उद्योजक सचिन वावरे यांनी कित्येक वर्ष कुंटुबावर तुळशीपत्र ठेवून समाजकारणाला वाहून घेतले आहे.’देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’,अशा या वि.दा.करंदीकर यांच्या काव्यापंक्तीप्रमाणे सचिन वावरे दातृत्वाने धावून आले आहेत.सुमारे ४० वर्ष पुलाच्या अडचणीमुळे हालअपेष्ट सोसलेल्या नागरिकांना एका समाजरत्नामुळे न्याय मिळाला आहे.यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील गोरेवस्ती ६१ फाटा येथे सचिन वावरे यांनी ३ लाख रुपये खर्चूण बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन विष्णुपंत टेळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील नागरीकांची गेल्या अनेक वर्षापासून पुलाची मागणी होती. सुमारे २०० लोकवस्ती आहे.त्यामुळे दुध,भाजीपाला,डाळींब,ऊसाची वाहतूक,हारवेस्टर, बोअर मशिन,आदी वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून पूल बांधण्याची मागणी करीत होते.
येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन वावरे यांनी स्वखर्चातून तीन लाख रुपयाचा पूल बांधला असून यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे.जर असे समाजरत्न पुढे आले, तर माळशिरस शहर विकासाभिमूक होईल,यामध्ये तिळमात्र शंका नाही. या स्वखर्चातून बांधलेला पुलाचा उद्धाटन कार्यक्रम पार पडला.
यावेळी मारूती येडगे,महादेव गोरे, सचिन तरडे,बबन खताळ, सुनिल पाटील, संतोष दडस,सचीन गोरे, अनिल येडगे, नितीन गोरे, बाबा चोरमले,विशाल मंजुळे, अक्षय जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या उदात्त हेतूने सचिन वावरे हे सर्वसामान्यांसाठी झटणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. रात्री-अपरात्री,अडचणींच्या प्रसंगी स्वत: खिशाला झळ सोसून आपले कर्तव्य पार पाडतात. यामध्ये सातत्य आहे.
“गेल्या अनेक दिवसांपासून या वार्डमधील नागरिकांच्या विविध समस्या वारंवार पुढे येत होत्या. त्या अनुषंगाने वीज,मुरमीकरण,पाण्यासाठी बोअर, गरजूंना साहित्य वाटप, अशा आवश्यक असणाऱ्या गोष्टी सचिन वावरे स्वखर्चातून करतात.” – आप्पासाहेब टेळे, नागरिक,६१ फाटा, गोरेवस्ती.