
उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या कामाचे कौतुक!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत-निगडी रस्त्यालगत दोन्ही बाजूस काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली होती. ही बाब जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या लक्षात आली. यावेळी त्यांनी शहरातील निगडी कॉर्नर ते घनकचरा डोपोपर्यंतच्या दोन्ही बाजूची काटेरी झुडपे काढून टाकल्याने विठ्ठलनगर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
जत-निगडी रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झुडपांना काढण्याचे काम हे प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या निदर्शनास आले. या काटेरी झुडपांमुळे लहान-मोठे अपघात होत असल्याने, ही काटेरी झुडपे काढणे आवश्यक होते.उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही काटेरी झुडपे बाजूला करत जत-निगडी रस्त्यांना मोकळा श्वास दिला. या कामामुळे जत-निगडी रस्त्यालगत असलेल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद