
कोरो इंडिया व सहयोग फौंडेशनचा उपक्रम
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील कोरो इंडिया संस्था व जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील सहयोग फौंडेशनच्या वतीने जत तालुक्यातील जत, देवनाळ, अचकनहळळी, निगडी येथील गरजू कुटुंब ,तृतीयपंथी व देवदासींना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. तालुक्यातील तृतीयपंथी व देवदासी यांचेही हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी मुंबई येथील कोरो इंडिया ही संस्था पुढे सरसावली व सहयोग शोशल फौंडेशन, अचकनहळळी यांच्या माध्यमातून अचकनहळळी, निगडी, जत व देवनाळ या गावातील सुमारे पन्नास गरजू कुटुंब व जत तालुक्यातील तृतीयपंथी व देवदासी महिलांना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा माल देण्यात आला.
यावेळी सहयोग सोशल फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, सुरज मनेर, जोतिराम सावंत , बिसलाप्पा कोरे, सिद्धनाथ ऐवळे, दाजी केंगार, संतोष हाक्के, नामदेव केंगार, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद