आटपाडी येथे बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण संस्थेची तालुका कार्यकारणी जाहीर : जिल्हाध्यक्षा सुष्मिता सुरेश मोटे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण संस्था,पुणे च्या सांगली जिल्हा शाखा अंतर्गत आटपाडी तालुक्याची कार्यकारिणी सांगली जिल्हाध्यक्षा सुष्मिता सुरेश मोटे यांनी जाहीर केली.
आटपाडी तालुका बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दि.१६ जुलै रोजी जाहीर करणेत आहे.
खरसुंडी येथील बौद्धाचार्य आयु.दगडु भिसे यांची आटपाडी तालुका अध्यक्षपदी व करगणी येथील आयु. बाळासाहेब कांबळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. माडगुळे येथील प्रा.नितिन सावंत व घरनिकी येथील आयु.शिवाजी खैरमोडे यांची तालुका उपाध्यक्षपदी, आटपाडी येथील आयु.सुशिलकुमार मोटे यांची सल्लागार,महेश काटे यांची प्रसिद्धीप्रमुख व पुजारवाडी (दिघंची) येथील आयूष्यमती ऋतुजा अक्षय बनसोडे यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण संस्था पुणे( तळेगाव दाभाडे नोंदणीकृत) या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांना एकत्र करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणेसाठी या संस्थेची स्थापना २०१५ मध्ये तळेगाव दाभाडे(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यातून) करणेत आली आहे.संस्थेचे ६ वर्षांपासून विविध उपक्रम सुरू आहेत.स्ंस्थेचे आठ (आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक,धम्म,प्रचार व प्रसार माध्यम, सांस्कृतिक,संरक्षण आणि व्यावसायिक) विभागात काम सुरू आहे.परंतु, कोरोनाच्या काळात लाखोजनांचा रोजगार, नोकरी गेली आहे.त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणेसाठी प्राधान्याने संस्थेने Career Bess या नावाने जाॅब पोर्टल दि.२६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू केले आहे.यात एक हजार कंपन्या सहभागी आहेत.
बौद्ध समाजातील युवक, महिला यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व व्यावसायिक बनण्यासाठी तयार करणे, (त्यामध्ये भांडवल निर्मिती, मार्केटिंग, विक्री, वाहतूक सुविधा इ. बाबत माहिती देणे व त्याबाबत सहकार्य करणे इ.) राज्यभर काम सुरू आहे.सांगली जिल्ह्यातील बांधणी सुरु आहे.त्यासाठी संस्थेने जिल्हा अध्यक्षा म्हणून आयूष्यमती सुष्मिता सुरेश मोटे (आटपाडी) यांची निवड केली आहे.
सांगली जिल्ह्यातील विविध दहा तालुकाध्यक्ष नेमून त्यांची तालुका कार्यकारिणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.तरी ज्यांना संस्थेत काम करायचे आहे,सभासद व्हायचे आहे,त्यांनी सांगली जिल्हा बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण या व्हाट्स्अप ग्रुपला https://chat.whatsapp.com/EVMRdH3WiyPACRvq6d38E0 या लिंकद्वारे जाँईन व्हावे व बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली जिल्हाध्यक्षा आयूष्यमती सुष्मिता सुरेश मोटे (संपर्क 7588167410,9420676422) केले आहे.