प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
पुण्यातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने सासवडजवळील भिवरी गावात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन, गुड बाय गुड्डी’ या आशियाची पोस्ट लिहिली आहे व प्राणत्याग केला.नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले असून प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45 वर्षे, रा.कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
प्रा.मेश्राम हे कर्वेनगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मंगळवारी, 13 जुलै रोजी सोशल मीडियावर ‘बाय बाय डिप्रेशन, गुड बाय गुड्डी’ असा मजकूर फेसबुकवर व्हायरल केला तसेच लोकेशनही शेअर केले. पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील पुणेे-सासवड मार्गालगत असणाऱ्या शेतामधील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विहिरीच्या काठावर मेश्राम यांचे चप्पल,रुमाल, मोबाईल, हेडफोन, पाकीट, मोटार सायकलची चावी आढळून आली. शेअर केलेल्या लोकेशन वरून त्यांचे मित्र या भागात शोध घेत होते. त्यांच्या साहित्यावरून विहिरीत शोध घेतला असता मृतदेह आढळून आला.
सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व मेश्राम यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.सासवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तेथील शेतकऱ्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला. मेश्राम यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांच्यावर औषध उपचार सुरू होते. ते निराशेत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर समजल्याचे सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी माहिती दिली. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचेही घोलप यांनीी सांगितले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या