शिक्षकाला ‘धुतला’पण अन् ‘धिंड’पण काढली!

शिक्षकाची काढली धिंड! धू-धू धुतला!
बारावीच्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवण्याच्या आमिषाने शरीरसुखाची करत होता मागणी!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या नामांकित महाविद्यालयातील शिक्षकास बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला गुण वाढवून देतो असे सांगत शरीर सुखाची मागणी केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी महाविद्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली.अंगावर शाई फेकून चांगला चोपही दिला.
पुण्यातील एका मध्यमवस्तीत असलेल्या महाविद्यालयात अभिजित पवार शिक्षक म्हणून कार्यरत आहे.बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु त्या विद्यार्थिनीने याला नकार दिला. त्यानंतरही तो शरीर सुखाची मागणी करत होता.त्याचा सतत त्रास सहन न झाल्याने विद्यार्थिनीने घरच्यांना ही माहिती दिली. त्यातून हा प्रकार समोर आला.
आज बुधवारी दुपारी मुलीच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांसह महाविद्यालयाकडे धाव घेतली. त्या शिक्षकावर शाही फेकत त्याचे तोंड काळे करून त्याला चोप देत विश्रामबाग पोलिस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शिक्षकाच्या बोलण्याचे रेकॉर्डिंगही मुलीने केले आहे.