शेगाव येथे अपघातात एकजण ठार; जत पोलिसांत गुन्हा दाखल

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील शेगाव येथे अचानक ब्रेक दाबून चारचाकी थांबविल्याने पाठीमागील दुचाकी समोरील वाहनावर आदळल्याने झालेल्या अपघातात संभाजी पांडुरंग शिंदे (वय 35 रा.वाळेखिंडी) यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चारचाकी वाहन चालक अनिल पांडुरंग साळे (रा. जत) यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी शिंदे व विक्रम भिमराव शिंदे दोघे रा.वाळेखिंडी हे मोटारसायकल (एमएच 10डी एफ 2111) वरून वाळेखिंडीकडे जात असताना शेगाव ते वाळेखिंडी रोडवर सिध्दीविनायक मंदिराजवळ संशयित अनिल साळे हा चारचाकी गाडी (नं. एम एच 50, सी 3570) भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन अचानक गाडी थांबविल्याने दुचाकी स्वार दोघे गाडीवर पाठीमागून आदळले. त्यात संभाजी शिंदे यांचे डोके रोडवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्याने जागेवर मयत झाला आहे. तर विक्रम शिंदे जखमी झाला आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ धनाजी शिंदे यानी जत पोलीसात फिर्याद दाखल केला आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणे गाडी चालवून अपघात घडविल्याप्रकरणी अनिल पांडुरंग साळे यांच्यावर भादविसं कलम 279,304(अ) 337,427 एम व्ही अँक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सा.पो.फौ. पवार करीत आहेत.