चराऊ कुरणे शेळी-मेंढी व तत्सम जनावरांना खुली करा.
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस येथील तहसील कार्यालय येथे मेंढपाळ आर्मीच्या वतीने माळशिरस तालुक्यातील चराऊ कुरणे शेळी-मेंढी व तत्सम जनावरांना चराईस खुली करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना मेंढपाळ आर्मीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष हनुमंत ठवरे यांनी सांगितले की,सध्या शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी चराऊ क्षेत्र उपलब्ध नसल्याने मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आला असून मोडकळीस येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेंढपाळांना चराऊ कुरणांमध्ये वनाच्या जमिनीमध्ये शेळ्या मेंढ्या हिंडु (चरू) दिल्या जातात.त्या अनुषंगाने आपल्या प्रक्षेत्रामध्येही ५ वर्षावरील प्रौढ वृक्ष असणाऱ्या क्षेत्रामध्ये शेळ्या-मेंढ्या हिंडवण्यास (चराईस) परवानगी द्यावी या याबाबतचे निवेदन माळशिरसचे तहसिलदारांना दिले असल्याचे हनुमंत ठवरे यांनी सांगितले.
नवीन लागवड 25 टक्के भागावर करण्यात यावी व उर्वरित 75 टक्के भाग चरण्यासाठी मुक्त सोडण्यात यावा.
मेंढपाळ पशुपालक व वन विभागाचे अधिकारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी वन विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. कुरणांमधील लागवड असलेल्या भागात वहिवाटा, छोटे तलाव, लहान-मोठे पाणीसाठे या जागांवर अडवणूक करू नये, कुरण क्षेत्रातील कोणत्याही नवीन जुन्या झाडांना इजा न होता चराई करण्यासंदर्भात मेंढपाळ व पशुपालकांना मार्गदर्शन करावे अशी विनंती निवेदनाव्दारे केली.
यावेळी मेंढपाळ आर्मीचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत ठवरे पाटील, माळशिरस उपाअध्यक्ष संतोष माने, शोशल मिडीया तालुका अध्यक्ष अभिजीत लोखंडे ,युवा नेते मोहन झंजे, ॲड. सिताराम झंजे, माजी सरपंच टि. डी. ठवरे, कोल्हटकर भाऊसाहेब, नामदेव गोरड, सदाशिव कांबळे, रावसो तरंगे, बाळासाहेब काकडे,गणपत काकडे,संजय कोडलकर, संतोष कांबळे, नाना काकडे,बिरूदेव काकडे,किसन काकडे,नामदेव काकडे,लाला तरंगे, गुंडा साळवे ,ज्ञानदेव रूपनवर,संजय माने,महादेव माने,कैलास हाडे अदी मेंढपाळ बंधू उपस्थित होते.
यावेळी बोलताना हनुमंत ठवरे म्हणाले की, लवकरात लवकर राष्ट्रीय संसद प्रमुख अर्जुनदादा थोरात ,महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते उत्तमरावजी जानकर यांचे मार्गदर्शनाखाली वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसोबत बैठक घेऊन तोडगा काढू व जिथे जिथे मेंढपाळ पालक यांचेवर हल्ले होत आहेत, याकडे जातीने लक्ष घालू हा विश्वास मेंढपाळ बंधूना दिला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद