माळशिरस येथे रक्तदान शिबीर संपन्न

कै.बापूराव सिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल हॉस्पिटल येथे ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

कै.बापूराव तुळशीराम सिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल हॉस्पिटल माळशिरस येथे रक्तदान शिबीर
घेण्यात आले.सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरामध्ये आज ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे जगावर संकट असल्याने या रक्तदान शिबिराला अनन्यसाधारण महत्व आले आहे. कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन कै. बापूराव तुळशीराम सिद यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना मास्क, सॅनिटायझर,जेवणाचा डबा देण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके , शिवाजीराव सिद , रामभाव शीद, भगवान सिद, नानासाहेब सिद ,सागर सिद ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश (भाऊ ) टेळे, माजी सरपंंच तुकाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे नेते रमेश माने, डॉ.अनिल पाटील, डॉ.पंकज नलावडे, डॉ.नितीन सिद , डॉ.संजय सिद, युवा उद्योजक सचिन वावरे, सचिन माने, गंगाधर पिसे ,अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.