आज ५४ पॉझिटिव्ह, २१ कोरोनामुक्त !

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.११/०७/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ११ जुलै रोजी नव्याने ५४ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २७ पुरुष व २७ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ५१ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील  ५० व तालुक्याबाहेरील ४ व्यक्तींचा समावेश आहे. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्याचे काम सुरू आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.११ जुलै,२०२१)

आटपाडी १२
मिटकी १
पिंपरी खुर्द ३
यपावाडी २
देशमुखवाडी २
गळवेवाडी १
जांभुळणी ५
झरे २
मापटेमळा १
निंबवडे १
पुजारवाडी ३
दिघंची ४
उंबरगाव १
लिंगीवरे २
करगणी १
मानेवाडी १
काळेवाडी १
नेलकरंजी १
वलवण २
खरसुंडी ३
चिंचाळे १
पाचेगाव १
शिंगोर्णी २
महूद १