जिल्ह्यात २४ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर ८२० नवे पॉझिटिव्ह! ९४४ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०६ जुलै,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.०६ जुलै रोजी २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ८२० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्यूकरमायकोसिसचा जिल्ह्यात आज एक रुग्ण सापडला असून आतापर्यंत २९७ रुग्ण सापडले आहेत. आज म्यूकरमायकोसिसने दोघाजणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०६ जुलै,२०२१

आटपाडी ३९ (मृत्यू १)
जत २९ (मृत्यू १)
कडेगाव ५९ (१)
कवठेमहांकाळ २० (०)
खानापूर ५१ (१)
मिरज ९७ (९)
पलूस ५६ (१)
शिराळा ५८ (२)
तासगाव ६६ (०)
वाळवा १९१ (५)
सांगली,मिरज महानगरपालिका १५४
(सांगली-११३ ,मिरज-४१)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-० ,कुपवाड-०)

एकूण ८२० (मृत्यू-२४)