सांगलीत लायनमन लाच घेताना ‘अँटीकरप्शन’च्या जाळ्यात!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित शहर विभाग दक्षिण उपविभाग सांगली येथील प्रधान तंत्रज्ञ मयूर जयवंत साळुंखे यास ५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सांगली शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या राहत्या जागेमध्ये असलेले विद्युत पोल काढून देण्यासाठी लाईनमन मयूर जयवंत साळुंखे (वय 43 वर्षे,मूळ रा. नांद्रे ता. मिरज जि. सांगली) याने १६ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये प्रथम स्वीकारून उर्वरित ६ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार ५ जुलै रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात देण्यात आली. 

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार लगेचच ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांच्या राहते जागेमध्ये असलेले विद्युत पोल काढून देण्यासाठी लाईनमन साळुंखे याने तक्रारदाराकडे ६ हजार रुपये लाचेची मागणी करून चर्चेअंती ५ हजार ५०० रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 

त्यानंतर लागलीच तक्रारदार यांच्या राहत्या घराजवळ विद्युत पोल काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सापळा लावला असता प्रधान तंत्रज्ञ साळुंखे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ५ हजार ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्या अनुषंगाने साळुंखे याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाला खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस उपायुक्त सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विभागाचे पोलिस उपअधीक्षक  सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे व प्रशांत चौगुले तसेच पोलिस अंमलदार धनंजय खाडे, संजय कलकुटगी, अविनाश सागर,संजय संकपाळ, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, सीमा माने, राधिका माने, श्रीपती देशपांडे, विना जाधव, चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.

लाचमागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाईन क्रमांक 1064 व तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262 तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.