पिलीव परिसरातील मोटारी चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

माळशिरस पोलीसांनी इलेक्ट्रीक मोटार चोरीचा लावला छडा व आरोपींना केली अटक!
संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
पिलीव परिसरात विद्युत मोटारींची चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांंच्या माळशिरस पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या पथकाने छडा लावून ही कारवाई केली. यामध्ये दोघा जणांना अटक करून दोन विद्युत मोटारी व पुण्यामधील दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आले आहेत.

नजीर नुरमहंमद मुलाणी (वय ५६ वर्षे रा. झिंजेवस्ती, ता.माळशिरस) यांनी झिंजेवस्ती गावच्या शिवारात निरा उजवा कालव्याच्या पूर्व दिशेस शेतजमीनीमध्ये स्वतःची विहीरीमध्ये एक पानबुडी पाण्याची मोटार बसविलेली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत माळशिरस पोलीस ठाण्यात ०१/०७/२०२१ रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत.

 गुन्ह्यातील आरोपींचा सपोनि शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने शोध घेतला. गोपनीय बातमीदारांकडून या विहीरीतील विद्युत पाणबुडी मोटर ही कुसमोड, पिलीव येथील आरोपींनी चोरली असल्याची माहीती मिळाली. त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले व आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले. या आरोपीकडे कसून तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडून गुन्ह्यातील एक पाच एच. पी.चा पानबुडी विद्युत मोटारपंप व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना कुसमोड ता. माळशिरस येथील पानबुडी मोटारीच्या आणखी एक चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. या गुन्ह्यातील एक ०५ एच. पी ची मोटार व सदर गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकुण दोन पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली असे एकुण ३४,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. या गुह्यात दोन आरोपींना अटक केले असून एक विधीसंघर्षीत बालक आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी  सातपुते,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, माळशिरसचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस हवालदार पंडीत मिसाळ, पोलीस नाईक राहुल वाघ, पोलीस हवालदार दत्ता खरात,सतिश धुमाळ,कुकाटे यांनी ही कारवाई केली आहे.