अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत तालुक्याचे आ.विक्रमसिंहदादा सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या पूर्व भागास तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर करार करणेविषयी विनंती केली. तालुक्यातील रिक्तपदांची माहिती देऊन त्या रिक्त जागा भरणेबाबत पत्र दिले.
जत तालुक्याचे विभाजन,जत येथील दिवाणी न्यायालय इमारत बांधकाम ,जत उमदी येथील पोलीस निवासस्थान बांधणे,जत येथील ट्रामा केअर सेंटर सुरु करणे , क वर्ग भटक्या धनगर समाजबांधवांसाठी 23 योजना असून त्या योजनेस निधीची मागणी करण्यात आली. तालुक्यातील विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.चर्चेवेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.
यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिरादार, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग,जत तालुका कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजयनाना शिंदे ,दान्नम्मा दुध संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन