जत शहरात बेकायदेशीर वृक्षतोड थांबवा:अन्यथा आंदोलन!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :   

जत शहर व जत तालुक्यातील विनापरवाना होणारी वृक्षतोड तात्काळ थांबविण्यात यावी व  वृक्षतोड करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,असे निवेदन युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स च्यावतीने वन विभागाला देण्यात आले आहे.
पर्यावरण विकास व संतुलन राखण्यासाठी आपण आपल्या परिसरातील जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.सध्या जत नगरपरिषद हद्दीतील जत हायस्कूल जत व बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळा जत या परिसरातील गेली 150 ते 175 वर्षापूर्वीची अनेक चिंचेची,लिबांची व अनेक इतर झाडे आहेत. या वृक्षामुळे तेथील हवेचे ऑक्सिजन प्रमाण सध्या तरी योग्य आहे व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्या झाडांची संरक्षण करण्याची गरज आहे. सध्या तेथे व्यवसायिक दृष्टिकोनातून प्लॉटिंग व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे हे मोठे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे जत शहर व जत तालुक्यातील परिसरातील विनापरवाना होणारी वृक्षतोड आपणाकडून तात्काळ थांबविण्यात यावी व संबंधित व्यक्तीवर (वृक्षतोड करणाऱ्या) योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.     

  झाडे लावा झाडे जगवा ,पर्यावरणाचा समतोल राखूया या ब्रीदवाक्य प्रमाणे वन विभागाकडून कार्य घडावे,असे निवेदन वन विभागाला दिले आहेत. दिलेल्या निवेदनाची योग्य ती कार्यवाही करावी,कार्यवाही न झाल्यास किंवा वृक्षतोड झाल्यास संबंधित कार्यालयातील अधिकारी वरती आमच्या संघटनेकडून योग्य ती दखल घेऊ व त्या अधिकारी वरती कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनास भाग पाडू अशा प्रकारचे निवेदन सांगली जिल्हा युनिव्हर्सल ह्यूमन राइट्सचे संघटक मंत्री नितीन बदडे व जत तालुका अध्यक्ष युनिव्हर्सल हुयमन राईट्स दिपक तुकाराम मोटे यांनी देऊन हा इशारा दिला आहे. यावेळी युनिव्हर्सल ह्यूमन राइट चे सदस्य दिगंबर बामणे सचिन कोळी ,स्वप्निल नाटेकर,संजय हिरवे,सुनिल मोटे उपस्थित होते.