कोसारीत जागतिक योग दिन साजरा!

सुभाष हाक्के

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:

भारत सरकार नेहरू युवा केंद्र सांगली संलग्न ग्रामीण विकास संस्था, कोसारी आणि महा एन जी ओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक योग दिनानिमित्त कोसारी ता. जत येथे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. यासाठी  मार्गदर्शक म्हणून रामचंद्र रणशिंगे, त्यांचे सहयोगी राहुल व्हनखंडे, आणि मुख्याध्यापक सुरेश सावंत आदी  उपस्थित होते. मन प्रसन्न करून आपल्या दैनंदिन जीवनातील आनंद मोठा करण्यासाठी प पु श्री श्री रविशंकरजी गुरूजी यांच्या द आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे वतीने  व्यायाम, योगासन,ध्यान घेण्यात आले. यासाठी कोसारी व आजूबाजूच्या गावातूनही लोक आले होते. त्यावेळी योगासनाचे महत्व सांगितले आणि बरेच प्रकार या दिनी करून घेतले. कोरोना  नियमांचे पालन करत सोशल डिस्टनस पाळून शिबीर संपन्न झाले. यासाठी गावातील माजी सैनिक टीम, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि महिला उपस्थित होत्या. सर्व सहभागींना  प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन शहाजी चव्हाण यांनी केले. संस्थेचे सर्व पदाधिकारी, सागर गुजले, विश्वास खटके,ओंकार काळे,विशाल महारनुर,विमल साळे  उपस्थित होते.अध्यक्ष विवेक टेंगले यांनी आभार मानले.