य.पा.वाडीतील टीचर्स फाउंडेशनची लसीकरण व कोरोना जनजागृती!

य.पा.वाडीतील टीचर्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रम! सायकल रॅलीद्वारे लसीकरण व कोरोना जनजागृती!

 नंदकुमार विभुते 

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

यपावाडी येथील टीचर्स फाउंडेशनच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात स्पीकर व डमडम मला डिजिटल लावून सायकल रॅली काढण्यात आली.यपावाडी, खानजोडवाडी, मासाळवाडी ,लेंगरेवाडी, माडगुळे या गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी आटपाडी येथेही जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

देशातून कोरोना हद्दपार करण्यासाठी शासनामार्फत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याच लसीकरण मोहिमेस प्रत्येक ग्रामीण भागातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी निरनिराळ्या  अफवांना ऊत आलेला आहे. यावर मात करण्यासाठी य.पा.वाडीतील टीचर्स फाउंडेशनमार्फत  १०० टक्के कोरोना लसीकरणासाठी प्रबोधनात्मक सायकल रॅली, दोन लहान बालकासह तहसीलदार सचिन मुळीक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सायकलवरस्वार होऊन यपावाडी, खानजोडवाडी, मासाळवाडी ,लेंगरेवाडी, माडगुळे या पंचक्रोशीत जनजागृतीचे काम करीत ही रॅली दोन दिवस गावातून समाज प्रबोधनाचे काम करत आहे.                      

यपावाडीतील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱे मान्यवर  एकत्र येऊन टीचर्स फाउंडेशनची स्थापन केली. या फाउंडेशनमार्फत सामाजिक प्रबोधन ,ग्रामस्वच्छता,वृक्षारोपण व शासकीय अभियानाचा प्रचार व प्रसार यासारखे विधायक उपक्रम राबविले जात आहेत.आता १००%टक्के लसीकरण, सोशल डिस्टंस , मास्कचा नियमित वापर ही मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमात सायकल रॅलीचे नियोजन केले आहे. प्रत्येक शिक्षकांने 25 ते 30 कुटुंबांचा 45 वर्षे वयोगटावरील व्यक्तींनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेल्या कुटुंबाचा घरोघरी जाऊन सर्वे केला. डोस न घेतलेल्या लोकांसाठी प्रबोधन करून लसीकरण मोहीम हाती घेऊन 30 जून पर्यंत गाव शंभर टक्के लसीकरण करण्याचे ठरवले. यपावाडी गावात टीचर्स फाउंडेशनच्या वतीने कोरोना केअर सेंटर, वृक्षारोपण, स्वच्छता इत्यादी उपक्रम सातत्याने सुरू आहेत.

 तहसिलदार सचिन मुळीक,आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार, डॉ. नरळे, डॉ.राठोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सांगली जिल्हा समन्वयक प्रा. सदाशिवराव मोरे,बळीराम चव्हाण,अजित चव्हाण,शरद चव्हाण,टी.डी.चव्हाण, आनंदराव चव्हाण, सदाशिव सावंत,  डी.व्ही.नांगरे हणमंत काकडे,  सुरेश चव्हाण, बापूसाहेब चव्हाण  आदी मान्यवर शिक्षकांनी व ग्रामस्थांनी रॅलीत सहभाग घेतला.

खानजोडवाडीत सरपंच रामचंद्र सूर्यवंशी यांनी स्वागत केले.प्रा.अनिल सूर्यवंशी यांनी स्वागत केले. खानजोडवाडी गाव शंभर टक्के लसीकरण करण्याची ग्वाही दिली.मासाळवाडी,लेंगरेवाडी, यपावाडी, खानजोडवाडी, माडगुळे या गावात जनजागृती करण्यात आली. सरपंच,उपसरपंच व मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.   

   या रॅलीचे माडगूळे गावातमध्ये आगमन होताच माडगुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय विभुते, माडगूळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अमोलशेठ विभुते, गदिमा स्कूल कमिटीचे चेअरमन एन.बी.विभुते,प्रसाद विभुते,डॉ.राठोड,सौ.सुशीला झोडगे,सदस्य नितीन लिगडे,प्रकाश झोडगे,दिलीप विभुते,महादेव मंडले, उपसरपंच विशाल झोडगे यांनी या रॅलीतील सदस्यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.