असेसमेंट उतारा प्रदान;ॲडिशनल डीपीचेही उद्घाटन!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
गोरडवाडी येथे गावठाणमध्ये नवीन ॲडिशनल डीपी मंजूर करण्यात आला.तसेच मुस्लिम समाज बांधवांना ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून दफन भूमीसाठी असेसमेंट उतारा देण्यात आला.त्यांच्या अस्मितेचा प्रश्न सुटला व गावठाण डीपीचे उदघाटन तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत पालवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,ओबीसी तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे,मांडवे सरपंच हनुमंत टेळे, शामतात्या मदने,झिंजेवस्तीचे उपसरपंच प्रकाश पाटील,युवक संघटक लहू पाटील,लक्ष्मण गोरड,रणजित काळे ,ऋतिक पालवे,सरपंच विकास बंडगर ,सदस्य शामराव बंडगर ,भिकाजी गोरड ,नाना हुलगे उपस्थित होते.
गोरडवाडीचे सरपंच बाळासाहेब गोरड, उपसरपंच दीपक गोरड, विजय गोरड , दादा गोरड ,विष्णू गोरड,पांडुरंग पिसे, माणिक कोकरे , शंकर यमगर , संदीपान कर्णवर , माजी सरपंच रामचंद्र गोरड ,ब्रम्हदेव हुलगे ,नवनाथ पिंगळे , योगेश हुलगे ,माजी चेअरमन संतोष गोरड , अजिनाथ कर्णवर , बापू गोरड ,हनुमंत गोरड , रामराव गोरड , ग्राफिक्स संजय कोळेकर ,गणेशराजे कोकरे ,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आदीनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कर्णवर यांनी केले. दीपक गोरड यांनी आभार मानले .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती