*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.२१/०६/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. २१ जून रोजी तालुक्यात नव्याने २० लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ७ पुरुष असून १३ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १० जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील १६ व तालुक्याबाहेरील कुरणवाडी येथील ३ व खवासपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२१ जून,२०२१)
आटपाडी 4
घाणंद 1
कौठुळी 1
खरसुंडी 2
गोमेवाडी 2
शेटफळे 3
गळवेवाडी 1
उंबरगाव 1
बेरगळवाडी 1
खवासपूर 1
कुरणवाडी 3

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर