३४ पॉझिटिव्ह,३९ कोरोनामुक्त !

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.१८/०६/२०२१ 

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. १८ जून रोजी तालुक्यात नव्याने ३४ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २७ पुरुष असून ८ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे २१ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील २७ व तालुक्याबाहेरील ७ व्यक्तींचा समावेश आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१८ जून,२०२१)

झरे 1
दिघंची 2
घाणंद 1
आटपाडी 4
खरसुंडी 1
निंबवडे 1
हिवतड 4
यपावाडी 1
जांभुळणी 3
विठलापूर 2
पिंपरी खु. 3
विभूतवाडी 2
घरनिकी 1
बेरगळवाडी 1
कटफळ 6
खवासपूर 1