अन्नदा पोषण आहार किटचे वाटप

ओंकार स्वरुपा फौंडेशनचा उपक्रम        

 अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:    

येळवी येथील गरजू लोकांना अन्नदा संस्था मुंबई व मिरज येथील रूग्ण सेवा प्रकल्प व ओंकार स्वरुपाच्या माध्यमातून प्रोटिनयुक्त पोषण आहार किटचे वाटपाचे आयोजन करण्यात आले. किटचे वाटप कोरोना महामारीच्यामुळे अनेक अडचणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अनेकांना रोजगारापासून वंचित होण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे सर्वच ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कष्टकरी लोक उपजिवीकेसाठी कोरोना लाॅकडाऊनच्या काळामध्ये त्यांचे फिरण्यावर निर्बंध आल्यामुळे त्यांच्यासमोर गुजराण करण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे या काळात आपल्याला अल्पशा मदतीचा हात संस्था देत आहेत.           

ओंकार स्वरुपा ही संस्था गावातील अनेक गरजू कुटुंबातील लोकांना आधार देण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत असल्याचे मत येळवीचे उपसरपंच सुनिल अंकलगी यानी सांगून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.        

अन्नदा संस्था मुंबई व रुग्ण सेवा प्रकल्प मिरजचे डाॅ.भालचंद्र साठे यांनी ओंकार स्वरुपाच्या कामावर विश्वास दाखवला व मदत योग्य ठिकाणी पोहोचवली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी यांनी त्यांचे आभार मानले.        यावेळी कोरोना निर्बंधाचे नियम पाळत कोणतीही गर्दी न करता आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी, संस्थेचे अध्यक्ष दिपक (आण्णा) अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील,सुरेश जगताप,प्रविण तोडकर, कृष्णदेव खंडागळे(मेजर), प्रकाश शिंदे, निलाप्पा स्वामी (काका), शांतीनाथ मालगत्ते,बजरंग चव्हाण ,दिलीप आवटे, अनंत सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.