
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,माळशिरस या विद्यालयाच्या वतीने विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) डॉ.आप्पासाहेब देशमुख (माजी उपनगराध्यक्ष,माळशिरस), ॲड.मिलींद कुलकर्णी (नगरसेवक,माळशिरस) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर व ओपन जिमचे उदघाटन करण्यात आले होते.यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी विद्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी हार, फेटा, शाल ऐवजी विद्यार्थ्यांच्यासाठी ५५ डझन वह्या, ९५ पेन, पेन्सिल पाकिट व इयत्तानिहाय पुस्तके इ.शैक्षणिक साहित्य घेऊन उपस्थिती लावली होती.यावेळी शासनाच्या सामाजिक नियमांचे पालन करत संस्थेकडून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क, सॅनिटायझर, एक लाखाचा विमा देण्यात आला.यावेळी एकूण १२३ जणांनी रक्तदान केले.यावेळी अर्जुनसिंह मोहिते-पाटील, किशोरसिंह सुळ, जगदीश निंबाळकर(तहसिलदार,माळशिरस) दीपरत्न गायकवाड (पोलिस निरीक्षक), विजय देशमुख, अशोक वाघमोडे, ताई वावरे, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, महादेव माने, महेश बोत्रे, निलेश घाडगे, प्रितमसिंह देवकाते, राजाभाऊ देवकाते, बबन देवकाते, गंगाधर पिसे, रावसाहेब देशमुख, सचिन वावरे, गोरख देशमुख, विशाल सावंत, धनाजी देवकर, ॲड.सत्यजित गलांडे, गणेश कुलकर्णी, अस्लम मुजावर, अनसर इनामदार, दिग्विजय झेंडे, तानाजी वाघमोडे, शौकत पठाण, प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद