१९ कोरोनामुक्त, ११ पॉझिटिव्ह!

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.१२/०६/२०२१ 

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. १२ जून रोजी तालुक्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर नव्याने ११ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ५ पुरुष असून ६ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ८ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आटपाडी तालुक्यातील या सर्व व्यक्ती आहेत.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.१२ जून,२०२१)

आटपाडी 2
आंबेवाडी 2
बोंबेवाडी 2
गळवेवाडी 1
करगणी 1
खरसुंडी 1
पिंपरी खु.1
यपावाडी 1