
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माळशिरस ते म्हसवड रोड परिसरात वृक्षारोपण करण्यास सुरुवात
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस तालुक्यांमध्ये ड्रीम फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करून प्रत्यक्ष लागवडीस सुरुवात केलेली आहे.
माळशिरस तालुक्यांमध्ये सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणारे ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष राम-लक्ष्मण, उपाध्यक्ष सोमनाथ मस्के, सचिव सागर गायकवाड, सदस्य तानाजी होळ यांच्यासह अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माळशिरस ते म्हसवड रोड परिसरात एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला असून जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सुरुवात केलेली आहे.एक लाख वृक्षांमध्ये चिंच, कडूनिंब, जांभूळ यांच्या बियाणे झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक आठवड्यातील शनिवारी व रविवारी श्रमदान म्हणून काम केले जाते.ड्रीम फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांच्याकडून श्रमदानातून वृक्ष लागवड व संवर्धन केले जात आहे. अशा या स्तुत्य उपक्रमास दिवसेंदिवस समाजामधून प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या दहा पाच वर्षांमध्ये निश्चितपणाने ड्रीम फाउंडेशनने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होईल, असा विश्वास ड्रीम फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना आहे. ड्रीम फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याचे माळशिरस व परिसरातून कौतुक केले जात आहे.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद