
निसर्गाचे जतन-संवर्धन करावे: सरपंच सौ.वृषाली पाटील
आटपाडीत पर्यावरण दिन व कोरोनाबाधित मृतांच्या स्मरणार्थ वृक्षारोपन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व कोरोनाबाधित मृतांच्या स्मरणार्थ फुलेनगर (काटेमळा) अंगणवाडी परिसर व कोरोना स्मशानभूमी आटपाडी येथे पर्यावरणप्रेमी लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.
यावेळी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड.धनंजय लक्ष्मणराव पाटील, उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, माजी सरपंच रावसाहेब सागर,ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा माळी,बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, विजय पाटील,चंद्रकांत हाके, उमाकांत देशमुख, सर्जेराव राक्षे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी जाधव,चंद्रकांत माळी, सचिन माळी, सुखदेव पाटील, श्रीकांत देशमुख, अंगणवाडी सेविका सौ. चपने व मदतनीस सौ. माळी आटपाडी यांनी सर्वांनी वृक्षारोपण करून निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक अनोखा संदेश दिला.
“निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास – तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आस – पृथ्वीला घेऊ देऊ श्वास” या सर्वांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही,जग सोडताना मात्र नाव असतं पण देह नाही.मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे ‘आयुष्य’ हे आयुष्य पर्यावरणाच्या संगोपनार्थ म्हणजे स्वतःच्या उज्ज्वल उद्यासाठी खर्ची घालवुया.कोरोनाबाधित व्यक्तीला ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,यासाठी निसर्गाचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद