प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:
घरगुती वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून चाकूने गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतः कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना खानापूर तालुक्यातील भूड येथे घडली.दोघांनाही उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पती रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुळेवाडी येथील दिपाली हिचा 2008 साली भूड येथील रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम याच्याशी विवाह झाला होता. त्यांना अनुश हा बारा वर्षाचा मुलगा व श्रावणी ही दहा वर्षाची मुलगी अशी अपत्ये आहेत. गेले चार दिवस पती संतोष दारू पिऊन घरगुती वादातून दिपालीबरोबर भांडण करीत होता. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नी दीपाली घरात झोपली असताना चाकूने गळ्यावर वार करून तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यावेळी प्रसंगावधान ओळखून दीपावलीच्या सासूने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतोष याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भूड येथील प्रशांत कदम यांनी याबाबतची माहिती सुळेवाडी ता. खानापूर येथील दिपालीचा भाऊ राहुल सुळे (वय 24) यास फोन करून दिली.राहुल सुळे तात्काळ सर्व कुटुंबीयांसमवेत भूड येथे पोहोचले. त्यावेळी त्यांना दिपाली स्वतःच्याच घरासमोरील अंगणात विव्हळत असलेली व शरीर भाजलेले तसेच गळ्यावर कापलेली जखम दिसली. याबाबतची फिर्याद राहुल सुळे यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये दिली. पती संतोष कदम याच्याविरोधात विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांनाही उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या