३३ कोरोनामुक्त, ४१ पॉझिटिव्ह!

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.०८/०६/२०२१ 

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि.८ जून रोजी तालुक्यात ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर नव्याने ४१ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २० पुरुष असून २१ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील ३९ व तालुक्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे.आटपाडीचे तहसीलदार तथा तालुका इन्सिडंट कमांडर सचिन मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान तांबोळी,तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस अथक केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.८ जून,२०२१)

आटपाडी 6
बनपुरी 2
दिघंची 2
कामथ 4
घाणंद 1
झरे 2
गोमेवाडी 1
खरसुंडी 3
लिंगीवरे 5
नेलकरंजी 4
पात्रेवाडी 1
शेटफळे 1
तळेवाडी 2
वरकुटे (ता.माण) 1
हरिपूर (सांगली) 1

गळवेवाडी 1
देशमुखवाडी 4