सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:
विधी सेवा प्राधिकरण समिती जत व ग्रामीण विकास संस्था, कोसारी यांच्या वतीने आज 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल कोसारी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी विधी सेवा प्राधिकरण समितीचे प्रतिनिधी संतोष पाठक यांचे मार्गदर्शन लाभले व मुख्याध्यापक सुरेश सावंत यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एका वर्षांमध्ये एक हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले, कार्यवाही समितीच्या अध्यक्षा विमल साळे,सचिव सागर गुजले,मनीषा काळे,यशवंत गोरे,विश्वास खटके,ओंकार काळे, उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद