
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
वाढदिवस म्हटले की वारेमाफ खर्च,पाटर्या,नशा हा आजच्या तरुणाचा ठरलेला पॅर्टन आहे,त्यातच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. या वाईट गोष्टीला छेद देत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोरडवाडी(ता.माळशिरस)येथे संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांनी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या निराधार,गरीब महिलांना किराणा किट वाटपाची संकल्पना विचारात आणली.दादासाहेब हुलगे,मुंबई म्हाडाचे कार्यकारी अभियंता भिमराव काळे,प्रकाश जाधव,आबासाहेब गोरड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निराधार,गरीब,ज्यांना जगण्याचा आधार नाही अशा महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. हे वाटप म्हणजे प्रसिध्दीसाठी नसून समाजात अडचणीत आलेल्या घटकाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकांने मदतीचा हात दिला तर नक्कीच या निराधार,गरीब घटकाला आधार मिळेल. म्हणून समाजातील प्रत्येकाने आप-आपल्या परीने पुढे येऊन गरीब,निराधार घटकाला आधार देण्याचे काम करावे. वाढदिवस म्हणजे पार्ट्या करणे,नशा करणे,रेव्ह पार्ट्या करणे नसून त्यादिवशी आपल्या हातून चांगले काम व्हावे. तो दिवस गरीब,निराधार लोकांच्या सेवेत समर्पित व्हावा, ज्याच्या त्याच्या परीने समाजाची सेवा घडावी, त्यासाठी हा दिवस असतो. तो संदेश आजच्या तरुणाईला देण्याची काळाची गरज झाली आहे. त्यामुळे हा सामाजिक उपक्रम स्तुत असून अशा सामाजिक उपक्रमामुळे समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण होतो. असेच सामाजिक उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरत असतात. हाच आदर्श घेऊन समाजातील गरीब,निराधारांच्या मदततीला अनेक मदतीचे हात पुढे यावेत हीच अपेक्षा आहे. किराणा किट वाटपाचा कार्यक्रम अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ गोरड,मच्छिंद्र गोरड,संतोष गोरड,दिपक गोरड,निलेश हुलगे,शशिकांत कोकरे,भारत गोरड,खंडू कळसुले,आबासाहेब पिंगळे,आबासाहेब गोरड,आप्पासाहेब गोरड,प्रदीप गोरड,नवनाथ हुलगे,रणजित गोरड यांनी मोलाचे सहकार्य केले. माजी सरपंच रामचंद्र गोरड,तुकाराम गोरड,एकनाथ गोरड,भारत सरगर,बाळूमामा कोळेकर,साधू हुलगे आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद