कोसारी येथे वृक्षारोपण करून अहिल्यादेवींची जयंती साजरी

सुभाष हाक्के

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कोसारी : 

कोसारी ता.जत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी केली. सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या मार्गदर्शनातुन कोसारी येथील ग्रामीण विकास संस्थेने हा निसर्गाशी जोडणारा चांगलाच उपक्रम राबविला आहे. या दिवशी संस्थेतर्फे अनेक प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याचा अवलंब करीत संस्थेने आजपर्यंत अनेक समाजकार्य घडवण्यात यश प्राप्त केले आहे.निसर्गाने झाडांची काय किंमत आहे हे आपल्याला भरपूर शिकवले आहे.       यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून शासकीय नियमांचे पालन करीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.ग्रामीण विकास संस्थेने निसर्गाशी आपलं नात अगदी जवळचं बनवलं आहे.    

   

यावेळी एनयुजे महाराष्ट्र चे जत तालुकाध्यक्ष अनिल मदने,ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक टेंगले, सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी,माजी सैनिक वसंत काळे,प्रवीण साळे,किसन थोरात,आदी मान्यवर उपस्थित होते.